Breaking News

नागरिकत्व कायद्याचा निर्णय हजार टक्के योग्य : पंतप्रधान मोदी

दुमका (झारखंड) : वृत्तसंस्था

कालपर्यंत पाकिस्तानकडून जे काम केले जात होते ते आता काँग्रेस करीत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसने ज्या पद्धतीने देशात आग लावण्याचे काम केले त्यावरून नागरिकत्व विधेयक लागू करण्याचा आमचा निर्णय हजार टक्के योग्यच होता हे सिद्ध झाले, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याचे स्वागत केले आहे. झारखंडच्या दुमका येथे रविवारी (दि. 15) आयोजित निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते.

या वेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने नागरिकत्व कायद्यावरून देशात विनाकारण वादळ निर्माण करून आग लावण्याचा प्रयत्न केला आहे. आग लावणारे कोण आहेत, हे त्यांच्या कपड्यांवरूनच माहीत पडते. आता त्यांच्याकडून देशाच्या हिताची कोणतीही आशा राहिली नाही. हे लोक केवळ त्यांच्या कुटुंबाचाच विचार करण्यात गुंग झाले आहेत, असा टोला मोदींनी लगावला.

काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष जाळपोळ करणार्‍यांना मूक समर्थन देत आहेत. हिंसेकडे कानाडोळा करीत आहेत, मात्र देश हे सर्व पाहत आहे. त्यामुळे संसदेने नागरिकत्व कायदा बनवून देशाला वाचवल्याचा लोकांचा पक्का समज झाला आहे, असेही मोदी म्हणाले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply