Monday , February 6 2023

फास्टॅग नव्या वर्षात होणार लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. 15 डिसेंबरपासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार होती, पण फास्टॅगचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने योजना लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. नव्या वर्षातच फास्टॅग योजना लागू होणार असून, ज्यांनी फास्टॅग घेतलेले नाही, त्यांना महिनाभराचा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्यांवर वाहनधारकांना मोठ्या रांगांचा सामना करावा लागतो. या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या अंतर्गत येणार्‍या टोल नाक्यांवर फास्टॅगची योजना तयार केली आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply