Breaking News

प्रतीक मोहिते नवोदित रायगड श्री 2019चा मानकरी

रेवदंडा ः प्रतिनिधी
रेवदंडा कोएसो स. रा. तेंडुलकर विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी (दि. 15) आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत मोहिते जीमचा प्रतीक मोहिते नवोदित रायगड श्री 2009चा मानकरी ठरला, तर बेस्ट पोझेस डिव्हीने एनर्जी जीमचा दिनेश कलमटे याची निवड करण्यात आली. रायगड जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन प्रमाणित इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या अंतर्गत चौल येथील मोहिते जीमच्या वतीने नवोदित रायगड श्री 2019 शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत एकूण 71 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 25 स्पर्धकांची निवड नवोदित रायगड श्री 2019 स्पर्धेसाठी करण्यात आली. स्पर्धा पाच वजनी गटांत विभागण्यात आली. पहिल्या 55 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक सुहास पाटील, द्वितीय क्रमांक शुभम कलमकर, तृतीय क्रमांक भगवान जाधव, चतुर्थ क्रमांक सुशील बंदरी व पाचवा क्रमांक दिनेश कलमटे तसेच 60 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक सुयोग पाटील, द्वितीय क्रमांक दिवेश पाटील, तृतीय क्रमांक संकेत भोबू, चतुर्थ क्रमांक प्रणय जाधव, पाचवा क्रमांक प्रवेश पाटील, 65 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक राहुल देशमुख, द्वितीय क्रमांक प्रतीक महाजने, तृतीय क्रमांक सुशांत गमरे, चतुर्थ क्रमांक ॠतीक बंगर, पाचवा क्रमांक सागर बळी, 70 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक अभिषेक वर्तक, द्वितीय क्रमांक सचिन अंभुले, तृतीय क्रमांक मधुकर म्हात्रे, चतुर्थ क्रमांक हर्षल अमीन, पाचवा क्रमांक प्रसन्ना म्हात्रे, तसेच 70 किलो अधिक वजनी गटात प्रथम क्रमांक प्रतीक मोहिते, द्वितीय क्रमांक आचल कडवे, तृतीय क्रमांक अजिक्य सायगावकर, चतुर्थ क्रमांक नागेश चांदी, पाचवा क्रमांक प्रथमेश लाड, तसेच मेन फिझिक्यू गटात प्रथम क्रमांक दिनेश राठोड, द्वितीय क्रमांक राहुल पवार, तृतीय क्रमांक प्रसाद पाटील, चतुर्थ क्रमांक बॉबी वागले-पाटील, पाचवा क्रमांक अल्पेश पाटील यांची निवड करण्यात आली. 

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply