नवी मुंबई : बातमीदार
नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर व अनिरुद्ध अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 15 डिसेंबर रोजी कळंबोली येथील सुधागड हायस्कुलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 45 नागरिकांनी रक्तदान केले व याचे संकलन करून तेरणा ब्लड बँकेत पाठविण्यात आले. अनिरुद्ध अॅकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेन्ट दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असून यामध्ये रक्तदानासारखा एक महत्वाचा उपक्रम राबवीत असतो. या शिबिरात रक्तदान केलेल्या नागरिकांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रक्त हे कृत्रिमरित्या निर्माण होऊ शकत नसल्याने याबाबत समाजात जनजागृती निर्माण करून, रक्तदानाचे महत्व लोकांना पटवून रक्त एकत्रित करणे गरजेचे आहे असे मत तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.