Breaking News

सीकेटी महाविद्यालयात रंगला ‘निर्मिती फॅशन शो’

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात ‘निर्मीती फॅशन शो 2019’शनिवारी झाला. या फॅशनशोचे आयोजन बी. सी. ठाकूर सेंटर फॉर स्कील, डेव्हलोपमेंट डिपांर्टमेंट ऑफ फॅशन डिझायनींगच्या वतीने करण्यात आले होते. निर्मीती फॅशन शो 2019 चे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉक्टर सीद्देश्वर गडदे यांच्याहस्ते करण्यात आले.  या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रुपा हलवादर, वर्षा पवार, इंद्रजीत देशमुख, श्वेता वोरा, सीकेटी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत बर्‍हाटे, फॅशन डीझाईन विभागाच्या वंदना देशमुख यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply