Breaking News

बेटी बचाओ, बेटी पढाओ मॅरेथॉनला कामोठ्यात लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

कळंबोली ः प्रतिनिधी

रायगड जिल्हा तायक्वांडोचे प्रमुख सुभाष पाटील यांच्या साथीने, तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बेटी बचाओ बेटी पढाओ संकल्पनेतून स्त्रीशक्ती फाऊंडेशनच्या वतीने एक पाऊल महिला सुरक्षिततेसाठी हा ध्यास घेऊन चळवळ उभारली आहे. या मॅरेथॉन चळवळीचे हे चौथे वर्षे आहे. आज महिला सुरक्षित कशा राहतील व मुली स्वतःचे स्वतः रक्षण कशा करतील या हेतूने महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबई काम करीत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ संकल्पनेतून मॅरेथॉनचे आयोजन नुकतेच कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते.

महिला सुरक्षिततेसाठी आयोजित या मॅरेथॉनमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, अंगणवाडीसेविका मदतनीस व महिला वर्कर तसेच बाईक रायडर, सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. या मॅरेथॉनसाठी आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

मॅरेथॉनमध्ये तायक्वांडोचे सुभाष पाटील, विवेक दिवेदी व सर्व शिक्षक, महिला पोलीस, गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी विमल बिडवे, त्यांचे सहकारी रोहित बंडगर, कामोठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बबन तुपे, विजया कदम आदी होते. एक हौसिंग सोसायटी अंतर्गत झालेल्या या मॅरेथॉनमधील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply