Breaking News

नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते जनआरोग्य ई-कार्डचे वाटप

उरण ः वार्ताहर

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ई-कार्डाचे वाटप उरण नगर परिषद नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या हस्ते नुकतेच उरण नगर परिषद सभागृहात करण्यात आले.

या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शहा, मुख्याधिकारी अवधूत तावडे, महिला बालकल्याण व स्वास्थ्य समिती सभापती आशा शेलार, नगरसेविका जान्हवी पंडित, दमयंती म्हात्रे, यास्मिन गॅस, रजनी कोळी व उरण पोस्ट ऑफिसचे अधिकारी ठाकरे आदी उपस्थित होते.

या वेळी शासनाकडून राबवत असणार्‍या विविध योजनांची माहिती नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी दिली, तर ठाकरे यांनी पोस्ट ऑफिसकडून दिल्या जाणार्‍या सेवा आणि योजनांची माहिती दिली.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply