Breaking News

डिव्हिलियर्सच्या निर्णयाबाबत कर्णधार प्लेसिस म्हणतो…

केपटाऊन : वृत्तसंस्था

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केलेल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. आगामी ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यासाठी तयार असल्याचे सांगून ब्राव्होने निवृत्तीच्या निर्णयापासून यू टर्न घेतला. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेही ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप खेळावा, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे नवनिर्वाचित प्रशिक्षक आणि याबाबत आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसनेही महत्त्वाचे विधान केले आहे.

डिव्हिलियर्सने गेल्या वर्षी मे महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, पण त्याने 2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आणि निवडीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. निवड समितीने मात्र त्याची निवड केली नाही. आता ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप

स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा डिव्हिलियर्सच्या पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कर्णधार प्लेसिस म्हणाला, एबीने वर्ल्ड कप खेळावा अशी लोकांची इच्छा आहे आणि माझ्याही मनात तेच आहे. त्यासाठी गेले दोन-तीन महिने त्याच्याशी चर्चा सुरू आहे. त्यातून काय निकाल लागतो हे लवकरच कळेल.

वर्ल्ड कप स्पर्धेला सामोरे जाताना तुमच्याकडे सर्वोत्तम खेळाडू असायलाच हवा. एबी मला आमचा सर्वोत्तम खेळाडू वाटतो, तर मग त्याच्याशी मी चर्चा का करू नये?

-मार्क बाऊचर, प्रशिक्षक, द. आफ्रिका

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply