Breaking News

मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेत 407 विद्यार्थ्यांचे लसीकरण

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेंतर्गत नवी मुंबई महापालिकेने 22 ऑक्टोबरपासूनच 10 महाविद्यालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात केलेली आहे. शासनाने दिलेल्या उद्दीष्टानुसार 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणारे नवी मुंबई हे एमएमआर क्षेत्रातील पहिले शहर असून महाविद्यालयीन लसीकरणावर लक्ष केंद्रीत करत त्याठिकाणी विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहेत.

मिशन युवा स्वास्थ्य मोहिम सर्व महाविद्यालयांमध्ये 2 नोव्हेंबरपर्यंत राबविली जात असून पहिला व दुसरा कोविशिल्ड डोस तसेच कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच प्राध्यापक, प्राध्यापिका आणि इतर कर्मचारी यांचेही या मोहिमेमध्ये लसीकरण केले जाणार आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत 11 लाख 11 हजार 154 नागरिकांनी कोविड लसींचा पहिला डोस घेतला असून पाच लाख 83 हजार 463 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण व्हावेत याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजन केले असून कोविशिल्डच्या पहिल्या डोसची तारीख होऊन 84 दिवस झालेल्या नागरिकांना दूरध्वनी करून दुसरा डोस घ्यावा म्हणून सूचित करण्यात येत आहे. पहिल्या डोसप्रमाणेच दुसर्‍या डोसचेही उद्दीष्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावे हा प्रयत्न असून यादृष्टीने विविध माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

तरी नवी मुंबईकर नागरिकांनी आपला पहिला डोस घेऊन विहित कालावधी पूर्ण झाल्यानंतर लगेचच नजीकच्या महानगरपालिका लसीकरण केंद्रावर जाऊन लसीचा दुसरा डोस त्वरीत विनामूल्य घ्यावा, असे सूचित करीत महापालिका आयुक्त बांगर यांनी आगामी उत्सवी कालावधी बघता कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply