रोहे ः महादेव सरसंबे
केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या एरोनॅटिकल इंजिनिअरींगच्या मॉडयुल परीक्षेत रोह्यातील दानियाल सलीम चोगले हा भारतात तिसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या उत्तूंग कामगिरीबद्दल दानियालवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रोह्यातील जे. एम. राठी हायस्कुलचा विद्यार्थी असलेल्या दानियाल चोगले याने पुण्यातील हिंदुस्तान एरोस्पेस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतले आहे. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत 11 वर्ष परीक्षेचा टप्पा त्याने अवघ्या दोन वर्षात पुर्ण करून नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे. कोकण अल्पसंख्यांक विचार मंच या संस्थेच्या वतीने महाड तालुक्यातील वहूर येथील फजंदार हायस्कुलमध्ये नुकताच आयोजित केलेल्या कार्यक्रमात जेएबीआर ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर बशीर हजवाने यांच्या हस्ते दानियाल चोगले याला चिराग ए कॉम हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधिक्षक किरण कुमार सूर्यवंशी, फंजदार हायस्कुलचे चेअरमन अ.रऊफ फंजदार, फारूख नाईकवाडी, कोकण अल्पसंख्याक विचार मंच अध्यक्ष कैसर दणदणे, संस्थेचे उपाध्यक्ष सलीम चोगले, अॅड.शादाब काटे आदी मान्यवर उपस्थित होते.