Breaking News

नगरसेविका सुशिला घरत यांच्या निधीतून डस्टबिनचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

नगरसेविका सुशिला घरत यांनी आपले शहर स्वच्छ आणि रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत शनिवारी त्यांच्या 2020-2021च्या नगरसेविका निधीमधून नवीन पनवेल येथे डस्टबिनचे वाटप केले. कचरा रस्त्यावर फेकण्याऐवजी डस्टबिनमध्ये टाकून आपला परिसर व त्याभोवतालची स्वच्छता राखावी, असे आवाहनही या वेळी सुशिला घरत यांनी केले. या वेळी माजी नगराध्यक्ष भाजप नेते संदिप पाटील, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अ‍ॅड. मनोज भुजबळ, ज्येष्ठ कार्यकर्ते जगदीश घरत, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, संजय भंडारी, भुषण म्हात्रे, अनंता ठाकूर, सतेज सोनावणे, संदीप नारायण पाटील, राहुल मालोतकर, अनंत रा. ठाकूर, संदीप बा. पाटील, अमित पाटील, रूपेश भुजबळ, किशोर रजपूत, एसान खान, शिवाजी त्रिभुवण, विश्वास पवार, शिवनाथ पन्हाले, प्रफुल पवार, विकास अहिर, हानुमंत मिसाल, लक्ष्मी चव्हाण, शारदा माने, माधुरी केणी, मनीषा मदाने, सीमा नरे, अनिता गायकर, वनिता पाटील, शहाबाई काशिद, रंजना पाटील, राणी लोंढे, वंदना माळी, माधुरी म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply