पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील स्वायत्त दर्जाप्राप्त चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)विभागाच्या वतीने विशेष निवासी शिबिराचे आयोजन नेरे शांतीवन येथील कुष्ठरोग निवारण समिती या ठिकाणी करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी एनएसएस शिबिराच्या माध्यमातून ‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे कौतुक त्यांनी केले, तसेच स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व सांगत असताना सामाजिक कार्यात सहभाग घेण्याचा सल्ला दिला. त्याबरोबरच त्यांनी जनार्दन भगत शिक्षण संस्थेच्या देदीप्यमान वाटचालीची माहिती दिली आणि स्वयंसेवकांना आपले उज्ज्वल भविष्य गाठत असताना समाज व राष्ट्राच्या उद्धारासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी संस्थेच्या गौरवशाली परंपरेची, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या वेगवेगळ्या स्तरावरील यशाबद्दल माहिती दिली. शांतीवनचे चेअरमन अॅड. प्रमोद ठाकूर यांनी सर्व स्वयंसेवकांना सात दिवसाच्या शिबिरातून सामाजिक बांधिलकी रुजवण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांनी समाजसेवेचे व्रत राष्ट्रीय सेवा योजनेतून घेतल्यानंतरच विद्यार्थी हा राष्ट्रीय सेवेकडे वळेल, असे मत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी प्रास्ताविकात नियोजित शिबिरातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसांच्या नियोजित कार्यक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये मुख्यत्वेकरून स्वच्छता अभियान, उन्नत भारत अभियान, एड्स जनजागृती, पथनाट्ये, रस्ते सुरक्षा, प्रदूषण नियंत्रण, दंतचिकित्सा शिबिर, वनसुरक्षा, वनराई बंधारा, पर्यावरण संवर्धन या नियोजित उपक्रमाची माहिती दिली. शिबिराच्या उद्घाटन समारंभास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरपंच राजश्री म्हसकर, नरेश पाटील, प्रा. व्ही. बी. नाईक, डॉ. योजना मुनीव, प्रा. सागर खैरनार, डॉ. मंदा म्हात्रे, डॉ. एस. बी. यादव, डॉ. बी. के. भोसले, डी. एस. बर्वे, जी. यु. पाटील, डॉ. के. एन. ढवळे, प्रा. शैलेश वाजेकर, प्रा. निलेश वडनेरे, डॉ. आर. ओ. परमार, प्रा. आर. ये. नवघरे, प्रा. विवेक पाटील, प्रा. गणेश पाटील, इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर वर्ग उपस्थित होते. प्रा. सत्यजित कांबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.