Tuesday , February 7 2023

मालमत्तेच्या नुकसानभरपाईचे वाटप सुरू

महाड : प्रतिनिधी

अतिवृष्टीत नुकसान झालेली घरे, जनावरांचे गोठे आणि वीज कोसळून जखमी झालेल्यांना शासकीय मदतीचे वाटप महाड महसूल कार्यालयामार्फत सुरू झाले आहे. महाड तालुक्यातील 196 जणांना 20 लाखांची मदत प्राप्त झाली आहे.

महाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसात अनेक गावांत घरांची पडझड आणि जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले होते. याकरिता शासकीय मदत यापूर्वी पहिल्या टप्प्यात वाटप झाली होती. यानंतर उर्वरित नुकसानग्रस्तांना दुसरा टप्पा दाखल झाला असून यामध्ये अशंत: नुकसान झालेली घरे, जनावरांचे गोठे, वीज कोसळून जखमी झालेले ग्रामस्थ यांचा समावेश असल्याचे निवासी नायब तहसीलदार प्रदीप कुडळ यांनी सांगितले. महाड महसूल विभागाकडे 10 लाख 79 हजार 820 रुपये आले असून ही रक्कम 196 जणांना वाटप करण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात मुमुर्शी आदिवासीवाडी येथे वीज कोसळून 21 जण जखमी झाले. या जखमींनाही शासनाकडून 90 हजार रुपये, तर निगडे गावात वीज कोसळून दोन जनावरे दगावली होती. या जनावरांची नुकसानभरपाई म्हणून 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. यापूर्वी जवळपास 15 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहितीदेखील कुडळ यांनी दिली.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply