Breaking News

‘सीएए’च्या समर्थनार्थ खारघरकर एकवटले

पनवेल : रामप्रहर वृत्त

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ भारत रक्षा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भारत विकास परिषद आदी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने खारघरमध्ये रविवारी (दि. 22) शेकडोंच्या संख्येने नागरिक एकवटले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी नागरिकत्व सुधारणा कायदा देशहितासाठी आवश्यक असल्याचे सांगितले.

‘सीएए’च्या समर्थनार्थ खारघरमधील शिल्प चौकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, रामजी बेरा, नीलेश बाविस्कर, नगरसेविका लीना गरड, शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, विजय पाटील, संध्या शारबिद्र, किरण पाटील, सचिन वास्कर, मोना अडवाणी, साधना पवार, विपुल चोटलिया, दिलीप जाधव, लखविंदर सिंग सैनी, भरत कोंडाळकर, राजेश शुक्ला आदी उपस्थित होते. 

हा उपक्रम बीना गोगरी, शिवम सिंह, शुभम व्यास, जयेश गोगरी, संदीप देशमुख, भावेश अंकोलिया, नवीन शर्मा, विक्रम सिंह यांच्या पुढाकाराने यशस्वी झाला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचे नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. सद्यस्थितीत भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षे राहणे आवश्यक असते. या कायद्यामुळे आता ही अट शिथिल होऊन सहा वर्षांवर आली आहे. हा कायदा देशहितासाठी आवश्यक असल्याने या कायद्याच्या समर्थनार्थ पनवेल, खारघरमध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक एकवटले होते.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply