Breaking News

आदिवासी विद्यार्थिनींची मोफत आरोग्य तपासणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

शासकीय अनुदानाशिवाय चालविल्या जाणार्‍या युसूफ मेहरअली सेंटरच्या आदिवासी वसतिगृहातील आदिवासी मुलींची पनवेल विभागीय

(ग्रामीण) डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि. 22) मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

 युसूफ मेहरअली सेंटरचे व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश रासम यांच्या पुढाकाराने आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी रासम यांनी वसतिगृहाच्या उभारणीमागची सेंटरची भूमिका स्पष्ट करीत आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचे आवाहन केले.  या वेळी पनवेल येथील डॉ. नीलिमा पवार, डॉ. शैलजा कानवडे व सेंटरचे निवासी डॉ. सुखदेव कांबळे यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींची तपासणी करून गरजेनुसार कॅल्शियम, लोह तसेच इतर आजारांनुसार विद्यार्थिनींना औषधे देण्यात आली. या शिबिराच्या संयोजनात संस्थेचे कार्यकर्ते अनिल विश्वकर्मा, दत्ता शिंगणे व एम. एस. डब्ल्यू विद्यार्थी रोहित कांबळे व सहकार्‍यांनी मेहनत घेतली.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply