पनवेल : रामप्रहर वृत्त
पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे कानपोली ग्रामपंचायतीच्या सरपंच विजया पाटील, तसेच श्याम पाटील व कैलास पाटील यांचे भारतीय जनता पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली आहे. कानपोली ग्रामपंचायत सरपंच नेमणुकीबाबत पक्षातर्फे सातत्याने सूचना देऊन सुद्धा पनवेल तालुका मंडल सदस्य श्याम पाटील, विभागीय शक्तीकेंद्र प्रमुख कैलास पाटील, सरपंच विजया कैलास पाटील यांनी त्याचे पालन केले नाही. या वर्तनामुळे पक्षाची हानी होत असल्याने त्यांच्यावर उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या शिफारसीनुसार पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.