Tuesday , February 7 2023

‘एनएसएस’च्या शिबिरात राष्ट्रीय गणित दिवस

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक  संस्थेच्या  चांगु  काना  ठाकूर  कला, वाणिज्य आणि विज्ञान  महाविद्यालयात (स्वायत्त दर्जाप्राप्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाद्वारे  सात  दिवसांचे निवासी शिबीर नेरे येथील कुष्ठरोग निवारण समिती येथे दि. 18 ते 24 डिसेंबर या  कालावधीत आयोजित केले होते. समाजसेवेतून व्यक्तिमत्व विकास यासाठी आयोजित केलेल्या या शिबिरात रविवारी (दि. 22) राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. प्रसिद्ध गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. या शिबिरात द्वितीय वर्षाच्या विज्ञान शाखेच्या राष्ट्रीय सेवा  योजनेच्या विद्यार्थ्यांनी हा दिवस साजरा केला. या कार्यक्रमात चांगु काना ठाकूर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही भाग घेतला. विद्यार्थ्यांनी गट करून या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि भरघोस प्रतिसादही दिला. त्याचप्रमाणे गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी सागर खैरनार सरांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाची सांगता करताना गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित माहितीपट प्रोजेक्टरद्वारे  दाखवण्यात आला. त्यांची व त्यांच्या कार्याची ओळख  विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. हा कार्यक्रम मुख्य कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी योजना मुनीव, कार्यक्रम अधिकारी सत्यजीत  कांबळे, कार्यक्रम अधिकारी सागर खैरनार  यांच्या  मार्गदर्शनाखाली  झाला. विद्यार्थ्यांनी  या उपक्रमास  भरघोस प्रतिसाद दिला.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply