Monday , February 6 2023

पत्रकार माधव पाटील यांची वाढदिवसानिमित्त ’पुस्तकतुला’

ग्रामीण भागातील शाळांना देणार पुस्तके भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त

ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने त्यांची ’पुस्तकतुला’ कार्यक्रम रविवारी (5 जानेवारी) सकाळी 10. 30 वाजता शासकीय विश्रामगृहात आयोजित केला  आला. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मानणारा वर्ग मोठा आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा पनवेलसह रायगड, नवी मुंबईत उमटविला. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची पुस्तकतुला करण्यात येणार असून जमा झालेली पुस्तके पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण भागातील शाळांना भेटरूपी देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शाळांना पुस्तके देण्याचा उद्देश असल्याने या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन मंचाच्या वतीने करण्यात आले असून पुस्तके जमा करण्यासाठी पत्रकार विवेक पाटील 9870999899, संजय कदम 9820168055, राजू गाडे 9619397706 किंवा हरेश साठे 8759707777 यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply