पनवेल : रामप्रहर वृत्त
खांदा कॉलनीमध्ये वाचनालयाची असलेली उणीव हि बाब लक्षात घेऊन संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सिटीझन फोरम व मॉर्निंग योगा ग्रुप या सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन पुढाकार घेत माझं वाचनालय याची सुरुवात केली आहे. स्थानिक रहिवाश्यांना वाचनाची आवड जोपासणे सहज साध्य व्हावे व भावी पिढीचा वाचनाकडे कल वाढावा हा यामागचा प्रमुख हेतू आहे. माझं वाचनालय हे अद्ययावत लेखन साहित्याने समृद्ध करणे इ-लायब्ररी चा वापर या वाचनालयात सुरु करणे, युवा वर्गासाठी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी याकरिता आवश्यक पुस्तक सामग्रीची सोय करणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेच्या परीक्षांचा अभ्यास करणे सोपे जाईल. हे उदिष्ट समोर ठेऊन या वाचनायाची निर्मिती केली आहे. या वाचनालयासाठी संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सिटीझन फोरम व मॉर्निंग योगा ग्रुप या सेवाभावी संस्थांच्या सर्व पदाधिकारी व सहकार्यांनी मोलाची मदत व सहकार्य केले असून यापुढेही माझं वाचनालयाच्या आधुनिकरणासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानस व्यक्त केला आहे. कॉलनीमधील असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत माझं वाचनालयाचा उदघाटन सोहळा झाला. माझं वाचनालय ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वीपणे साकारण्यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष संजय गणा पाटील, पनवेल पालिकेच्या प्रभाग समिती ब चे सभापती तथा संजय भोपी सोशल क्लबचे अध्यक्ष संजय दिनकर भोपी, माजी अध्यक्ष विश्राम एकंबे, सचिव रमाकांत भगत, खजिनदार पी. टी. घरत , मॉर्निंग योगा ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील,अलर्ट सिटीझन फोरमचे अध्यक्ष आनंद पाटील, आर. आर. सावंत, अरुण म्हसकर, राहुल पारगावकर, मोतीराम कोळी, लक्ष्मण साळुंखे, सुनील श्रीखंडे, संजय वैद्य, भगवान विचारे, दत्तात्रय कुलकर्णी, रामदास गोवारी, योगेश पाटील, सुभाष गावडे, सुरेश म्हात्रे, सुधाकर पाटोकर, संजय धानोरकर, दिलीप कोरडे, डॉ. गुरमे, डॉ. विनय पाटील, डॉ. मोतलिंग, घुगे साहेब, मांजरेकर साहेब, प्रसन्ना, शेळके, रत्नाकर वाघ, सतीश म्हात्रे, कुलकर्णी काकू व संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सिटीझन फोरम व मॉर्निंग योगा ग्रुप, आझाद जेष्ठ नागरिक संघ यांनी अथक परिश्रम घेतले.