पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल मध्ये नाताळ हा सण विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये अमेझिंग ग्रेस प्रेअर ग्रुपच्या वतीने बुधवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थितीत लाभली. या वेळी नगरसेविका राजेश्री वावाकेर, भाजप नेते महेंद्र वावाकेर यांच्यासह अमेझिंग ग्रेस प्रेअर गु्रपचे सदस्य आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करुन नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.