Breaking News

कर्जतमधील रानभाजी महोत्सवाला ग्राहकांची मोठी गर्दी

कर्जत : बातमीदार

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दहिवली येथील सभागृहामध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्याच्या आदिवासी भागातील  शेतकर्‍यांनी महोत्सवात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आणि जंगली भाज्या मांडल्या होत्या. या महोत्सवाला स्थानिक ग्राहक आणि शेतकर्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ज्ञ आर. डी. सावळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या रानभाजी महोत्सवात अळू, कुर्डू, शेवगा, टाकळा, माठ, भारंगी, लोत, कुडा, शेवळा, गाभोळी, कवळा, कुडाच्या शेंगा, आघाडा, भोकर, मोहाच्या दोडी आदी रानभाज्या तसेच रानभाज्यांचे विविध पदार्थ या महोत्सवात प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी रानभाज्यांचे महत्त्व पटवून सांगितले. या रानभाजी महोत्सवात कर्जत तालुक्यातील अजित पाटील, मारुती बागडे, साधूराम पाटील, महादेव कोळंबे आदी प्रगतशील शेतकरीही सहभागी झाले होते. या महोत्सवात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कर्जत मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांनी या रानभाजी महोत्सवाचे नियोजन  केले होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply