Breaking News

कार्यशाळेस पत्रकारांचा प्रतिसाद

अलिबाग : जिमाका

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मुंबई येथील पत्र सूचना कार्यालयांच्या वतीने पेण येथील सौभाग्य इन इंटरनॅशनल हॉटेलमध्ये नुकताच पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळा  घेण्यात आली. या उपक्रमास प्रतिसाद लाभला.

या वेळी पत्र सूचना कार्यालयाच्या सहाय्यक संचालक भावना गोखले, प्रेस क्लबचे नवी मुंबई अध्यक्ष मनोज जालनावाला, रायगड अध्यक्ष अनिल भोळे, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव विजय मोकल, ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील, माहिती प्रसारण मंत्रालयाचे देवेंद्र हिरनाईक, श्रीयंका चॅटर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात माहिती प्रसारण मंत्रालयच्या कामाविषयी व त्याचा पत्रकारांच्या कामात कसा उपयोग होतो याविषयी माहिती दिली. तसेच पत्रकारांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. तर दूसर्‍या सत्रात दै. पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे यांनी महिलांवरील अन्याय अत्याचार व मीडियाची त्यातील जबाबदारी याविषयी माहिती दिली. यानंतर स्टेट बँक इंडियाच्या पेण शाखा प्रबंधक धर्मेंद्र कुमार सिंग यांनी शासनातर्फे छोट्या व्यावसायिकांना देण्यात येणारे मुद्रा लोन याविषयी माहिती दिली. पत्र सूचना कार्यालयाच्या सहाय्यक संचालक भावना गोखले यांनी पत्रकारांसाठी असणार्‍या कल्याणकारी योजनांची विस्तृत माहिती दिली व पत्रकारांच्या समस्याची माहिती घेतली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply