तळा : प्रतिनिधी
तळा आनंदवाडी येथे सोमवारी (दि. 4) सकाळी 11च्या सुमारास इनोव्हा गाडीचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तळ्याकडून इंदापूरकडे इनोव्हा गाडी (एमएच 46-डब्ल्यू 5177) घेऊन जात असताना चालक जयेंद्र पारावे (रा. बडदाड वाडी) याचा वाहनावरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आनंदवाडी येथील अंगणवाडीतील सेविका प्रज्ञा प्रशांत सकपाळ (वय 32), सारिका संदीप जाधव (वय 5), रियांश गणेश पवार (वय 5) आणि रिया गणेश पवार (वय 4) हे सर्व गाडीखाली सापडले. त्यातील प्रज्ञा सकपाळ आणि सारिका जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर रियांश आणि रिया यांना गंभीर दुखापत झाली आहे. रियांशला पुढील उपचारासाठी अलिबाग आणि रियाला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, गाडीचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper