Breaking News

जागतिक रॅपिड बुद्धिबळचे कोनेरू हम्पीला विजेतेपद

मॉस्को : वृत्तसंस्था
भारताच्या कोनेरू हम्पीने रशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. हम्पीने चीनच्या लेई टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव केला. महिला गटात भारताच्या हम्पीने, तर पुरुष गटात
नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने विजेतपद मिळवले.
या स्पर्धेतील प्रत्येक फेरीत हम्पीने नऊ गुण मिळवल्याने ती टिंगजीसह बरोबरीत राहिली. दोघींचे गुण समान झाल्यामुळे विजेतेपदाचा निर्णय आर्मेगेडोन गेम पद्धतीने करण्यात आला. पहिला गेममध्ये पराभव झाल्यानंतर हम्पीने दुसरा गेम जिंकला आणि अखेरच्या निर्णायक गेमसह विजेतेपद मिळवले.
पहिल्या गेममध्ये पराभव झाल्यानंतर दुसर्‍या गेमध्ये मला कमबॅक करता आला. दुसरा गेम हा अवघड होता, पण त्यात मी विजय मिळवला. अखेरच्या गेममध्ये माझी स्थिती चांगली होती. त्यामुळे मला सहज विजय मिळवू शकले, असे हम्पीने सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply