Breaking News

‘युनायटेड रन’ म्हणत नवी मुंबई धावली

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महानगरपालिका आणि स्टर्लिंग इन्स्टिट्युट, नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवी मुंबई युनायटेड रन’ या संकल्पना वाक्यावर आधारित नवी मुंबई महापौर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील 3500 हून अधिक नागरिकांनी सहभागी होत ही मॅरेथॉन सर्वार्थाने यशस्वी केली. देशभरात आयकॉनिक इमारत म्हणून नावाजल्या जाणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय इमारतीसमोर या रनला सकाळी 6 वाजता नवी मुंबईचे महापौर  जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला.

या रनमध्ये सहभागी होण्यासाठी नवी मुंबईसह इतरही शहरांतूनही नागरिक उत्साहाने उपस्थित होते. प्रो-कबड्डीमधील स्टार खेळाडू रिशांक देवाडिगा,  विशाल माने, नीलेश सोळुंखे यांची या वेळी विशेष उपस्थिती प्रेरणादायी होती. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी नागरिकांचा विशेषत्वाने मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

या मॅरेथॉनमधे खुल्या पुरुष गटात 21 किमीचे अंतर 1 तास 12 मि. 49 सेकंदात पूर्ण करून कुरूई कोईच हाफ मॅरेथॉऩचा विजेता ठरला, तसेच खुल्या महिला गटात 1 तास 41 मि. 36 सेकंदात 21 किमी अंतर पूर्ण करून वंदना अहिरे महिला हाफ मॅरेथॉन विजेती ठरली. पुरुष गटात अविनाश पवार व अनिल कोरवी त्याचप्रमाणे महिला गटात रिझवाना अनुप व शिंजनी मिओगी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सर्व विजेत्यांना मेडल्ससह रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आली.

10 किमी अंतराच्या स्पर्धेमध्ये पुरुष गटात दिनेश म्हात्रे, आनंद सुरवडे, नितेंद्र पोर्लेकर, तसेच महिला गटात कविता भोईर, शीतल तिवारी, निर्मला होसाल्ली अनुक्रमे तीन क्रमांकाचे मानकरी ठरले. 5 किमी अंतराच्या स्पर्धेतील मुलांमध्ये जयप्रकाश यादव, शिरीष पवार व पार्थ पोळ यांनी त्याचप्रमाणे निकिता मोर्ले, तन्वी कदम, समिता सचदेव यांनी मुलींच्या गटात अनुक्रमे तीन क्रमांक पटकाविले. 3 किमी अंतराच्या स्पर्धेतील मुलांच्या व मुलींच्या गटातील पहिल्या तीन क्रमांकांची सहा पारितोषिके आंबेडकर नगर रबाळे येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादन करीत आपली नाममुद्रा उमटविली. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये निखील गवळी, तुषार कोठाल, ओमप्रकाश पाल तसेच विद्यार्थिनींमध्ये साक्षी जाधव, काजल शेख व वृषाली गवई यांचा अनुक्रमे तीन क्रमांकांमध्ये समावेश होता.

1 किमी अंतराच्या 14 वर्षाखालील मुलांच्या गटातही महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, आंबेडकरनगर रबालेचे विद्यार्थी वैभव मोरे, आदित्य भारती व इमाम बाबा शेख अनुक्रमे तीन क्रमांकांचे विजेते ठरले. मुलींच्या गटात राधिकाबाई मेघे विद्यालय, ऐरोलीच्या विद्यार्थिनी श्रावणी गुरव, तन्वी माने व सिद्धी वेजारे या तीन क्रमांकांवर विजयी झाल्या.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply