पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने चालविले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 5) सकाळी 10.30 वाजता भिंगारी येथील महावितरण कार्यालय येथे टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
थकीत बिलांमुळे महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात ढकलण्याचे पाप केले आहे. याविरोधात महावितरणच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यभर मंडल स्तरावरील महावितरण केंद्रांवर टाळे ठोको आणि हल्लाबोलआंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कार्यकर्ते व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …