पनवेल : रामप्रहर वृत्त
खारकोपर येथील मंगेश स्पोर्ट्सच्या वतीने स्व. तुळशीराम बाबू ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रविवारी (दि. 29) या स्पर्धेला भेट दिली. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणार्या दापोली संघाला गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, भार्गव ठाकूर, अनंता ठाकूर, किशोर पाटील, भाऊ भोईर, साईचरण म्हात्रे, निर्गुण कवळे, सुनील पाटील, भानुदास ठाकूर, कांबळे गुरुजी आदी उपस्थित होते.
Check Also
माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास
ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …