Wednesday , February 8 2023
Breaking News

नेरळ किंग एनपीएलचा विजेता

कर्जत : बातमीदार
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील क्रिकेटपटूंसाठी  आयोजित करण्यात आलेली नेरळ प्रीमियर लीग (एनपीएल) नेरळ किंग या संघाने जिंकली. नेरळ वॉरियर संघ उपविजेता ठरला.
नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील मैदानावर 10 स्थानिक व्यावसायिक संघांमध्ये एनपीएल साखळी पद्धतीने खेळविली गेली. यात नेरळ लायन, नेरळ किंग, नेरळ डेअर डेव्हिल्स, नेरळ रॉयल, नेरळ वॉरियर, नेरळ इंडियन, नेरळ नाईट रायडर, नेरळ चॅलेंजर आणि नेरळ सनराईज या संघांचा समावेश होता. स्पर्धेचे थेट प्रेक्षपण टेनिस क्रिकेट डॉट कॉमवरून करण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम सामना नेरळ वॉरियर आणि नेरळ किंग या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यात नेरळ किंग संघाने चार षटकांत तब्बल 78 धावा कुटल्या. नंतर फलंदाजी करताना नेरळ वॉरियर संघ फार मोठी कमाल करू शकली नाही आणि अंतिम सामना त्यांनी गमावला.
या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणार्‍या नेरळ लायन संघाचा मकरंद दहिवलीकर याला केसरी कॅप देऊन, तर सर्वाधिक गडी बाद करणार्‍या नेरळ डेअर डेव्हिल्सच्या हरिष कराळे याला पर्पल कॅप देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून नेरळ किंगच्या सुहास बोडके याला व उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार नेरळ डेअर डेव्हिल्सच्या सचिन वाघला देण्यात आला. अंतिम सामन्याचा मानकरी नेरळ किंगचा अजीम शेख ठरला, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार नेरळ वॉरियरचा भाऊ राठोड याने पटकाविला.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply