Monday , February 6 2023

गोवठणे संघ अजिंक्य

उरण : वार्ताहर
तालुक्यातील गोवठणे येथे प्रशांत स्पोर्ट्सचे संचालक मनोज पाटील यांच्या सौजन्याने आयोजित क्रिकेट स्पर्धेत श्री गणेश गोवठणे संघाने विजेतेपद पटकाविले. सारडे इलेव्हन संघ उपविजेता ठरला. त्यांना, तसेच वैयक्तिक उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभास भाजप गोवठणे अध्यक्ष रोशन म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य प्राची पाटील, मनोज पाटील, संतोष वर्तक, प्रवीण पाटील, रवी म्हात्रे, निलेश म्हात्रे, विश्रांती म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद म्हात्रे, रोशन म्हात्रे, राणी म्हात्रे, प्रेम पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रेम पाटील, सनी पाटील व समीर पाटील यांनी केले.

Check Also

सर्वांच्या सहकार्याने शाळेची प्रगती शक्य -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त गावकरी, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि संस्था या सर्वांचा सहयोग असला, तर …

Leave a Reply