पनवेल : रामप्रहर वृत्त
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक संजय सुदाम कडू यांची क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा 4 ते 9 जानेवारी 2020 या कालावधीत गुजरातमधील बडोदा येथे स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया व इलेव्हन स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आली आहे.
संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेमध्ये मागील वर्षी महाराष्ट्र राज्याच्या संघाने स्पर्धेतील एकूण सहापैकी पाच सुवर्ण व रौप्यपदक जिंकून दिले होते. त्याच कामगिरीचा विचार करून कडू यांची राष्ट्रीय प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper