Breaking News

सावंतवाडीत भाजपचा शिवसेनेला दे धक्का, संजू परब नगराध्यक्षपदी

सावंतवाडी : येथील नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजू परब विजयी झाले असून, त्यांनी शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतकर यांचा पराभव केला आहे. हा पराभव म्हणजे शिवसेनेचे आमदार व दीपक केसरकर यांना मोठा धक्का, तर भाजप नेते नारायण राणे यांचे मोठे यश मानले जात आहे.

मतमोजणीत पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे बाबू कुडतरकर 301 मतांनी आघाडीवर राहिले, पण दुसर्‍या फेरीत संजू परब यांनी 250 मतांची आघाडी मिळवली. ही आघाडी त्यांनी तिसर्‍या फेरीत कायम राखली. अखेर त्यांचा 313 मतांनी विजय झाला.

Check Also

पनवेल कोळीवाड्यात आई एकविरा मातेचे तैलचित्र, सभामंडप, सेल्फी पॉईंटचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त आई एकविरा मातेचे तैलचित्र, सेल्फी पॉईंट आणि सभामंडप पनवेल कोळीवाड्याची शान …

Leave a Reply