Tuesday , February 7 2023

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी शिक्षकाला दहा वर्षाचा कारावास

अलिबाग : प्रतिनिधी

जादा शिकवणी घेण्याच्या बहाण्याने पीडित अल्पवयीन मुलीवर शिकवणी शिक्षकाने वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्या शिक्षकाला जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अक्षय रंगराव पाटील (22) असे शिक्षा झालेल्या आरोपीची नाव आहे. खांदा पनवेल येथे राहणार्‍या अक्षय पाटील याच्याकडे पीडित मुलगी शिकवणीसाठी जात होती. 12 जून, 2015 रोजी आरोपीने पीडित मुलीवर जादा शिकवणी घेण्याच्या बहाण्याने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन बलात्कार केला.

पीडित मुलीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात अक्षय पाटील याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भा.दं.वि. कलम 376(2)(एफ)(एन) तसेच पोक्सो कायदा कलम 3, 4, 5 (एल)(ओ)(पी) 6 अन्वये गुन्हा दाखल केला. खांदेश्वर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोप पत्र सत्र न्यायालयात दाखल केले.

खटल्याची सुनावणी सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात सुरू होती. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. अश्विनी बांदीवडेकर-पाटील यांनी एकूण सहा साक्षीदार नोंदविले. त्यात पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली. पोलीस उपनिरीक्षक एन.एम. जाधव यांचा तपास महत्वाचा ठरला. सर्व साक्षीपुरावे अक्षय पाटीलच्या विरोधात सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याला दोषी ठरवून दहा वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply