Breaking News

शेवगाव-मुंबई बसचे पनवेल येथे स्वागत

पनवेल : बातमीदार

शेवगाव-पाथर्डी रहिवासी मित्र परिवाराच्या वतीने पनवेल आगार या ठिकाणी शेवगाव-मुंबई शयनयान व आसनाची व्यवस्था असणार्‍या व नव्याने सुरू झालेल्या बसचे स्वागत करण्यात आले. चालक साहेबराव मिसाळ व वाहक बाळासाहेब पानसरे यांच्या हस्ते गाडीचे पूजन झाले. त्यांचे राजेंद्र राऊत व गणेश राऊत यांनी स्वागत केले. चंद्रकांत देवढे यांनी प्रास्ताविक केले. देवा बोडखे, प्रताप आठरे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रवीण म्हस्के, सूत्रसंचालन उमेश बळीद व आभार निलेश दिवटे यांनी मानले. या गाडीसाठी सहकार्य करणारे शेवगाव आगार प्रमुख वासुदेव देवराज, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक अनमोल फंड यांचे आभार मानण्यात आले.

Check Also

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल …

Leave a Reply