Breaking News

रसायनीत रेझिंग डेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मोहोपाडा : प्रतिनिधी

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाला स्वतंत्र ध्वज देण्यात आला. तेव्हापासून हा दिवस ‘रेझिंग डे’म्हणून साजरा केला जातो. या रेझिंग डे दिवसांत विविध उपक्रम पोलीस ठाण्यामार्फत होतात. रसायनी पोलीस ठाण्याच्या वतीने मोहोपाडा येथील जनता विद्यालयात बुधवारी (दि. 5) रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला. या अनुषंगाने पोलीस ठाण्यामार्फत विद्यार्थ्यांना विविध शस्त्रांची माहिती देण्यात आली. यामध्ये 7.62 एमएम एसएलआर, 9 एमएम पिस्तल, आरोपी बेडी, राऊंड आदी वेपनवर रसायनी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद वायंगणकर यांनी माहिती दिली. कोणीही बँकविषयक माहिती मागत असल्यास देऊ नये. एखादी गोष्ट घडल्यास पोलिसांना संपर्क साधावा, असे मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या हातात शस्त्र देऊन त्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. महिला पोलीस कर्मचारी नेहा जाधव यांनी मार्गदर्शन करताना कोरोनावर मात करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग ठेवले पाहिजे. शिवाय अपघात झाल्यास त्या ठिकाणी उपस्थित राहून मदत करावी, असे आवाहन केले. या वेळी विद्यार्थ्यांना करिअर गाइडन्स केले. पोलिसांची भीती बाळगू नये. एखादी तक्रार द्यायची झाल्यास पोलीस ठाण्यात यायला घाबरू नका. तक्रारीचे निराकरण केले जाईल. मुलींनी कशाप्रकारे सावधानता बाळगली पाहिजे. ओळखीतून कसे गैरप्रकार केले जातात याची माहिती दिली, तर पोलीस नाईक विशाल झावरे व मंगेश लांगी यांनी विद्यार्थ्यांना शस्त्र कसे हाताळावे याचे मार्गदर्शन केले. या वेळी शालेय शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply