Breaking News

स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणार्‍या काँग्रेसचा जाहीर निषेध  

पनवेलमध्ये भाजपकडून जोरदार निदर्शने

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून त्यांची बदनामी करणार्‍या काँग्रेस पक्षाविरोधात शनिवारी (दि. 4) पनवेल भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या वेळी काँग्रेसच्या विकृत संस्कृतीचा जाहीर निषेध करण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या निषेध कार्यक्रमास भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, एकनाथ भोपी, सरचिटणीस अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, माजी तालुकाध्यक्ष तानाजी खंडागळे, विश्वनाथ कोळी, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती तेजस कांडपिळे, संजय भोपी, नगरसेवक संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, समीर ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, सुशिला घरत, माजी नगरसेवक जगदिश गायकर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, पंचायत समिती सदस्य राज पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चाचे महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, स्वाती कोळी, नीलिमा वैती, संजय जैन, चंद्रकांत मंजुळे, विजय म्हात्रे, रमेश नायर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते माठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे दोन वेळा जन्मठेप भोगणारे एकमेव स्वातंत्र्यसेनानी आहेत. त्यांनी राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केले. अशा या महापुरुषाची बदनामी करण्याचे षडयंत्र काँग्रेसकडून अद्याप सुरूच आहे. मध्य प्रदेश राज्यात सध्या काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. भोपाळ येथील काँग्रेस सेवादलाच्या कार्यक्रमात ’वीर सावरकर कितने वीर?’ हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. सावरकरांविषयी लिहिलेल्या या पुस्तकात सावरकर आणि गोडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यांची नाहक बदनामी करण्यात आली. अत्यंत वाईट शब्दांत याबाबत लिखाण करण्यात आल्याने सावरकरप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत असून, काँग्रेसच्या या कृत्यावर सर्व स्तरांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीरांची बदनामी करण्याचे दुःसाहस काँग्रेसने पुन्हा एकदा केले आहे. काँग्रेसचे डोके ठिकाणावर नसल्यानेच ते अशा प्रकारचे षडयंत्र रचत असल्याची टीका करीत या राष्ट्रविरोधी षडयंत्राचा या वेळी तीव्र निषेध करण्यात आला.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply