Monday , February 6 2023

कर्जत रेल्वेस्थानकात वाय-फाय सेवा कार्यान्वित

कर्जत : प्रतिनिधी

मध्य रेल्वेने चार वर्षांपूर्वी काही रेल्वे स्थानकात मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व प्रथम मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर ही सेवा सुरू झाली. आता कर्जत स्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करून रेल्वे प्रशासनाने येथील  प्रवाशांना नवीन वर्षांची भेट दिली आहे.

रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने जानेवारी 2016मध्ये घेतला होता. त्यानुसार आत्तापर्यंत भारतात सुमारे पाच हजार पाचशे रेल्वे स्थानकांवर ही सुविधा सुरू केली आहे. मध्य रेल्वेनेही काही स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवा सुरू केली आहे. मात्र  मुंबई – पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या कर्जत स्थानकात ही सेवा कधी उपलब्ध करून देणार? असा प्रश्न कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी दीड वर्षांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाला विचारला होता. त्या वेळी स्थानकांच्या श्रेणीनुसार ही सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, असे उत्तर रेल्वे प्रशासनाने त्यांना दिले होते.    

याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना विचारले असता त्यांनी, आत्तापर्यंत मध्य रेल्वेच्या 348 स्थानकांवर वाय-फाय सुविधा सुरू केली असल्याचे सांगितले. तर वरिष्ठ विभागीय सिग्नल व दूरसंचार अभियंता जनार्दन सिंग यांनी कर्जत रेल्वे स्थानकात वाय-फाय सेवा सुरू झाल्याचे लेखी स्वरूपात कळविले आहे.

आताच्या संगणकीय युगात वाय-फाय सेवेला महत्व आहे. अन्य ठिकाणी ही सेवा असल्याने कर्जतलासुद्धा त्याचा लाभ व्हावा त्यादृष्टीने प्रयत्न केले आणि त्याला यश आले. प्रवाशांनी या सेवेचा उपयोग सकारात्मक दृष्टीने करावा.

-पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ता, कर्जत

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply