Breaking News

भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले.जि. प. च्या इनामपुरी गावातील शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व बिस्किटांचे वाटप भाजप युवा मोर्चा खारघर अध्यक्ष विनोद घरत यांच्या माध्यमातून करण्यात आले.

मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमण काळात देशातील सर्व शाळा बंद होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाची मोहीम हाती घेतल्याने बाधितांची संख्या कमी झाल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने वह्या वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास भाजप खारघर मंडल सरचिटणीस दीपक शिंदे, मुख्याध्यापक अनिल कदम, आयटी सेलचे संयोजक रूपेश चव्हाण, युवा मोर्चा उपाध्यक्ष शुभ पाटील, खजिनदार प्रमोद पाटील, वामन म्हात्रे, सारिका जाधव, प्रीती दिघे, नूतन डांगळे, जयश्री सूर्यवंशी, काव्या आंबीरे, राखी शर्मा आदी उपस्थित होते.

विनोद घरत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून प्रेरणा घेत दरवर्षी वह्या वाटप करीत असल्याचे सांगितले, तर दीपक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सराव व शिस्त याचे महत्त्व सांगितले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply