माणगाव : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला जमावबंदीचा आदेश धुडकावून एकत्रितपणे क्रिकेट खेळल्याने माणगाव तालुक्यातील डोंगरोळी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू थांबविण्यासाठी जारी केलेल्या आदेशाची पायमल्ली करून संसर्गजन्य आजार पसरवायची हयगय व घातक कृती करून डोंगरोळी येथे नथुराम पाखड यांच्या शेतात एकत्र जमून नऊ जण क्रिकेट खेळत असताना दिसून आले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी या नऊ जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 188, 269, 270 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 37(3) 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र वाटवे करीत आहेत.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …