पनवेल : सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन नुकतेच झाले. या संघाच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिंधुरत्न पुरस्काराने शनिवारी (दि. 4) सन्मानित करण्यात आले. संघाचे संस्थापक सदस्य व माजी सरचिटणीस प्रकाश रावळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रदीप रावले, वासुदेव सावंत, अनिल नेमळेकर, बाबाजी नेरूरकर, दीपक तावडे आदी उपस्थित होते.