पनवेल : रामप्रहर वृत्त
पालघर केळवे रोड येथे निहॉनसिकी कराटे अॅण्ड स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीने आयोजित 42व्या राज्यस्तरीय ऑल इंडिया कराटे कॅम्प आणि अजिंक्यपद स्पर्धेत उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)च्या कराटे क्लबने काता आणि कुमिते या क्रीडाप्रकारात नेत्रदीपक कामगिरी करून अजिंक्यपद पटकाविले.
या स्पर्धा शिबिरात मुंबई, नवी मुंबई, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, गोवा, गुजरात या राज्यांतील 250हून अधिक कराटेपटूंनी सहभाग घेतला. यामध्ये ‘आरटीआयएससी’ कराटे क्लबमधील वैदही ठाकूर, कृपा ठाकूर, निमिष डे, नंदिनी ठाकूर, उत्कर्ष नारायण, निर्भयी तावडे, मालिनी तावडे, अनुप घरत, जिविका पाटील, माहिका पाटील, आर्या साळवी, आराध्य साळवी, ट्रिस्टोन नादर, शैलिन मादर व सुप्रिया यांनी मिळून 5 सुवर्ण, 14 रौप्य आणि 15 कांस्य अशी एकूण 34 पदकांची कमाई करून स्पर्धेच्या अजिंक्यपदावर नाव कोरले.
यशस्वी कराटेपटूंना प्रशिक्षक राकेश तिवरेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सरावासाठी उत्तमोत्तम सुविधा व प्रोत्साहन ‘आरटीआयएससी’चे संचालक, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिले, तर कार्यवाह समीर कोलगे यांचेही सहकार्य लाभले.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …