पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापलिकेच्या पोटनिवडणुकीत रूचिता लोंढे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्याअंतर्गत पनवेल शहरातील मिरची गल्ली या परिसरात भाजप, आरपीआय युतीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी दणकेबाज प्रचार केला. या वेळी माजी नगरसेविका कल्पना ठाकूर यांच्यासह युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या जागी त्यांची कन्या रूचिता लोंढे यांना भाजप, आरपीआयच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. प्रचारासाठी उमेदवार रूचिता लोंढे या प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून
त्यांचे आशीर्वाद घेताहेत.
प्रचारावेळी माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस अमरिश मोकल, स्वाती कोळी, चिन्मय समेळ, मानसी गेटे, राकेश पोटे, परेश शेट्टे, शार्दुल आमरुते, सोमनाथ तांडेल, राकेश पवार, मयूर पानसनायर, मंगेश पिळविळकर, तुषार कापरे, हितेश गायकवाड, प्रदीप मांजरे, राकेश भुजबळ, पिंटू तांबोळी, संतोष गुजर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.