Breaking News

द्रुतगती महामार्गावरील संरक्षक कठडे धोकादायक

खोपोली : प्रतिनिधी

जलद प्रवासापेक्षा अपघातामुळे जास्त चर्चेत असलेल्या मुंबई- पूणे द्रूतगती महामार्गावरील सुरक्षा उपाययोजना तकलादू असल्याचे अनेकवेळा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. या द्रूतगती महामार्गावर बाजूपट्टीलगत सुरक्षेसाठी लोखंडीपट्टीचे कठडे बसविण्यात आले आहेत. अनियंत्रित झालेले वाहन मार्गिका सोडून भरकटल्यास संरक्षक कठड्याला धडकून अपघाताची तीव्रता कमी व्हावी, हा मुख्य उद्देश संरक्षक पट्टीचा आहे. परंतु या अगोदर आणि वर्ष संपताना कारचे लागोपाठ घडलेले दोन भीषण अपघात काळजाचा थरकाप उडवणारे होते. ताशी ऐंशी ते शंभर किलोमीटर वेगमर्यादेने जाणार्‍या कार संरक्षक पट्टीला धडकल्यानंतर कार पूर्णपणे चिरली जावून तिघांचा जागीच मृत्यू तर सहा जण गंभीर झाले. या अगोदरदेखील अशा प्रकारे कार धडकून मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षिततेसाठी असलेली लोखंडीपट्टी काळ ठरत असून, अपघातानंतर कार हायड्ाने खेचून काढावी लागत आहे. यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे. अनेकदा चालकाच्या चुकीने तर कधी टायर फुटल्याने असे अपघात घडत असून, त्यातील जिवीतहानी टाळण्यासाठी लोखंडी संरक्षक पट्टीला पर्याय शोधण्याची गरज आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply