Breaking News

सुधागडात रास्त भाव धान्याचा काळाबाजार

महसूल विभागाची कारवाई; पुरवठादारावर गुन्हा दाखल

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर बुद्रुक येथील रास्त भाव दुकानात पाठविण्यात आलेले धान्य सोमवारी (दि. 6) तेथे न सापडता ते चक्क खाजगी गोडावूनमध्ये ठेवलेले आढळून आले. यासंदर्भात महसुल विभागाने केलेल्या कारवाईत धान्य व वाहने जप्त करण्यात आले असून, सबंधीतावर रात्री उशिरा पाली पोलीस स्थानकांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपुर्वी सुधागड तालुक्यातील पाच्छापूर येथील रास्त भाव दुकानातील धान्य परस्पर लंपास होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पालीतील अशोक ओसवाल यांच्याकडे सिध्देश्वर बुद्रुक येथील रास्त भाव धान्य दुकानात धान्य पोहचविण्याची जबाबदारी दिली होती. मात्र सदरचे धान्य टेम्पो (एमएच-06, एजी-3353) व टेम्पो (एमएच-06, एजी-4309) मध्ये भरुन पाली शहरातील जुन्या पोलीस ठाण्यासमोर व  पंचायत समिती कार्यालायासमोरील जयंत ओसवाल यांच्या मालकीच्या व अनुपम कुलकर्णी यांनी भाड्याने घेतलेल्या गोडावूनमध्ये आढळून आले. पालीचे पुरवठा निरिक्षक सुमिता सुरेश डाके यांनी सोमवारी (दि. 6) त्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण 14हजार 342 रुपये किमतीचे 62.36 क्विंटल (पोती 124) तांदुळ, तसेच तीन हजार 671 रुपये किमतीचे 28.24 क्विंटल (पोती 56) गहू असे एकूण 18 हजार 013 रुपये किंमतीचे धान्य वाहनांसह जप्त करण्यात आले. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात सबंधीताविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास  पोलीस हवालदार मोहन बहाडकर करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply