Breaking News

वैभव जाधव ‘कनिष्ठ मुंबई श्री’

मुंबई : हेल्थ रूटीन फिटनेसच्या वैभव जाधव याने शुभम धुरी आणि खुशाल सिंग यांचे कडवे आव्हान पार करीत कनिष्ठ मुंबई श्री या किताबावर नाव कोरले. दिव्यांगांच्या मुंबई श्री स्पर्धेत परब फिटनेसच्या सुदिश शेट्टीने बाजी मारली, तर फॉर्च्युुन फिटनेसच्या अभिषेक पाडगावकरने नवोदित मुंबई श्री हा मान मिळविला.

मालाड पूर्वेला झालेल्या या स्पर्धेत चार विविध प्रकारांमध्ये 200पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. कनिष्ठ मुंबई श्री किताबासाठी सहा गटविजेत्यांमध्ये कडवी लढत रंगली. अखेर पंचांनी वैभव, शुभम आणि खुशाल यांच्या शरीरसौष्ठवाची तुलना केली. काही मिनिटांच्या चर्चेनंतर त्यांनी वैभव जाधवला किताब विजेता घोषित केले.

Check Also

अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….

काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …

Leave a Reply