Breaking News

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पुरस्कार वितरण

अलिबाग : प्रतिनिधी

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी (दि. 6) पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ पत्रकार, युवा पत्रकार, छायाचित्रकार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा  रामनारायण रायगड पत्रभूषण पत्रकारिता पुरस्कार मुरूड येथील ज्येष्ठ पत्रकार मदन हणमंते यांना, रामनारायण युवा पत्रकारिता पुरस्कार अलिबाग येथील पत्रकार प्रमोद जाधव आणि माथेरान येथील पत्रकार मिलिंद कदम यांना, तर स्व. म. ना. पाटील ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार चिरनेर येथील दत्तात्रय म्हात्रे तसेच उत्कृष्ट छायाचित्रकार बोर्लीपंचतन येथील छायाचित्रकार अमेय नाझरे यांना प्रदान करून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह,  मानपत्र व रोख रक्कम असे त्याचे स्वरूप होते.

अभय आपटे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. ज्येष्ठ पत्रकार डॉ. राहुल गडपाले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मदन हणमंते, प्रमोद जाधव, मिलिंद कदम, दत्तात्रेय म्हात्रे, अमेय नाझरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र घोडके यांनी केले. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे सचिव संतोष पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद वालेकर, पत्रकार बळवंत वालेकर आदी या वेळी उपस्थित होते. शैलेश पालकर यांनी आभार मानले.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply