Breaking News

ओशन व्हिक्टर टग बोटीचे जलावरण, जेएनपीटीच्या कंटेनर हाताळणीत येणार सुलभता

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

जेएनपीटीचे अध्यक्ष, सनदी अधिकारी संजय सेठी यांनी जेएनपीटीचे वरिष्ठ अधिकारी आणि भागधारकांच्या उपस्थितीत ओशन व्हिक्टर या नव्या टग बोटचे जलावरण केले.

नव्याने जलावरण झालेल्या ’ओशन व्हिक्टर’मुळे विविध आकारांच्या जहाजांची हाताळणी करण्यास मदत होईल. त्यामुळे मोठ्या जहाजांच्या हाताळणीदरम्यान अधिक सुरक्षितता प्राप्त होईल. त्याबरोबरच मोठ्या लाटा तसेच मान्सूनच्या विविध परिस्थितींमध्ये टग बोटीमुळे परिचालनांस सुरक्षितता मिळेल.

एझिमथ स्टर्न ड्राइव्ह संरचना असलेली ‘ओशन व्हिक्टर’ ही नवीन टग बोट रॉबर्टलन डिझाईनवर आधारित असून ती अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांनी सुसज्ज आहे. अग्नि वर्गात पदनामित केलेल्या या टग बोटचा जेएनपीटीच्या प्रगत ताफ्यात समावेश झाला आहे. ‘ओशन व्हिक्टर’ दोन निगाटा मुख्य इंजिनचा वापर करते. प्रत्येक इंजिन 750 रेव्ह / मिनिटांत 1471 घथ ऊर्जा विकसित करते. त्यामुळे 50 टनांचे बॉलार्ड पुल आणि सुमारे 12 नॉट्सच्या पुढे वेग देते. उच्च कामगिरी आणि जहाज हस्तांतरण क्षमता प्रदान करण्यासाठी या टगची रचना केली गेली आहे त्यायोगे जेएनपीटीच्या ताफ्यात क्रांती घडून येईल.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply