Breaking News

एमएनएम विद्यालय अ‍ॅण्ड टीएनजी ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन

उलवे नोड : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील एमएनएम विद्यालय अ‍ॅण्ड टीएनजी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी साडे पाच वाजता आयोजित केलेला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तर प्रमुख अतिथी जेएनपीटीचे ट्रस्टी तथा भाजप जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष यशवंत देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य भाऊशेठ पाटील, वसंतशेठ पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तथा खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेजचे प्राचार्य एस. टी. गडदे यांची उपस्थती लाभणार आहे. या समारंभास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्राचार्य नम्रता न्युटन व शाळा कमिटी अध्यक्ष भार्गव ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply