Breaking News

विसपुते कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांना पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र राज्यस्तरीय सामाजिक बांधिलकी फाऊंडेशन, नागपूर तर्फे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा इ. क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षी आदर्श समूह संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा कांबळे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नागपूर येथे या पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. डॉ. सीमा कांबळे यांचे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतही अत्यंत उल्लेखनीय कार्य आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष अभ्यंकर, नागपूरचे आयुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते, संचालिका संगिता विसपुते व इतर सर्वांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply