उरण : वार्ताहर
युईएस स्कूल, ज्युनिअर अॅण्ड सिनिअर कॉलेजमध्ये ’फन फेअर व पॅरेन्टस् इव्हिनिंग’ मोठया जल्लोषात बुधवारी (दि. 8) साजरा झाला. युईएसच्या भव्य पटांगणात विविध खाद्य पदार्थाचे व खेळांचे स्टॉल्स लावलेले होते, त्यापैकी पहिल्या स्टॉलला बांधलेली फित कापून युईएसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर यांनी ’फन फेअर व पॅरेन्ट्स इव्हिनिंग’चे उद्घाटन केले. त्यांच्यासोबत सन्माननिय अतिथी म्हणून त्यांच्या सौभाग्यवती मंजिरी पाडगांवकर उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युईएसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ व त्यांच्या सौभाग्यवती मंजिरी पाडगांवकर तसेच उरण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सायली सविन म्हात्रे यांनाही पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, मानद सचिव आनंद भिंगार्डे, मानद सहसचिव चंद्रकांत ठक्कर, खजिनदार विश्वास दर्णे, विश्वस्त सदस्या व माजी प्राचार्या स्नेहल प्रधान, विश्वस्त सदस्य व माजी अध्यक्ष डव्होकेट राजेंद्र भानुशाली, पीटीए उपाध्यक्ष व सचिव यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सिनियर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य, स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या, सिनियर कॉलेजचे एचओडी व प्राथमिक व माध्यमिक विभागातील सुपरवायझर्स तसेच सर्व पीटीए मेंबर्सही ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.