Breaking News

‘लोकसभे’च्या घोषणेनंतर आयपीएलचे वेळापत्रक ठरणार?

मुंबई : प्रतिनिधी

देशात यंदा लोकसभा निवडणूकांची धुम सुरू आहे, पण या वेळीच देशात इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) रंगणार आहे. हे दोन्ही महासोहळे एकाचवेळी जर भारतात झाले; तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सर्वांचा नजरा आयपीएलच्या वेळापत्रकावर लागलेल्या आहेत. 4 फेब्रुवारीला आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु आता नव्या माहितीनुसार लोकसभा निडवणुकीच्या तारखा ठरल्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आहे.

मे-जूनमध्ये होणार्‍या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केली होती. आयपीएलच्या वेळी भारतामध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती, पण बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले होते, परंतु त्या वेळी त्यांनी वेळापत्रक जाहीर केले नाही.

सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यासाठी निवडणूक होईल. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. 2009मध्ये निवडणुकीमुळे संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती; तर 2014मध्ये स्पर्धेचा काही टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात आला होता.

यंदा आयपीएल, लोकसभा निवडणूक व वर्ल्ड कप हे एकाच वर्षी आल्या आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. ‘आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर आम्ही वेळापत्रक जाहीर करू. त्यानंतरच नियोजन करण्यात येईल,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply